नीताणे हे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील प्रगतिशील गाव तालुका पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे एकूण लोकसंख्या २७७१ असून लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावातील अनेक कुटुंबातील एक तरी व्यक्ती शासकीय सेवेत आहेत. नीताणे हे शिक्षकांचे गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. नीताणे गाव जिल्ह्यात द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध आहे. नीताने गावापासून साल्हेर किल्ला हे ठिकाण २२ किलोमीटर अंतरावर आहे. मांगीतुंगी जैन तीर्थक्षेत्र १२ किलोमीटर अंतरावर आहे.